Water supply

Need to find and destroy illegal water line connection... It will help to save water.
I request you please do under ground water line connection audit specially slum area's. Also recommend water meter on each connection.
Comments
प्रतिक्रिया द्या
10 May 2018 07:55 PM
इरफान राजे, तुमची पाणी वाचविण्याची तळमळ आम्हाला आवडली. तुमचे विचार खूपच छान आहेत पण पुणे महानगर पालिकेने याआधीच प्रत्येक नळ जोडणीसाठी मीटर अनिवार्य केले आहे फक्त फरक एवढाच आहे त्याची कठोरपणे अंमल बजावणी होत नाही. या गोष्टी ला खूप कारणे आहेत जसे लोकांमध्ये असलेली पाणी बचतीबाबत ची उदासीनता , अनधिकृत नळ जोडणी , स्थानिक नगरसेवकांनी मतदानाच्या आधी दिलेल्या मोफत पाण्याचे स्वप्न , संबंधित खात्याचे व्यवसायिकांबरोबर झालेले संगनमत आणि सर्वात शेवटी जलवाहिन्याचे दुरुस्ती कडे झालेले दुर्लक्ष. केवळ झोपड्पट्टीमध्येच नाही तर मोठ्या सोसायटी मध्ये सुद्धा अधिकृत नळ जोडणी बरोबर अनधिकृत नळ जोडणीचे प्रमाण सुद्धा लक्षणीय आहे. माझ्या मते केवळ झोपड्पट्टी धारकांना लक्ष न करता वरील सर्व अनधिकृत नळ जोडणी देणारे प्लम्बर हेच या सर्वांच्या मुळाशी आहेत. अनधिकृत नळ जोडणी देणाऱ्या या प्लंबर वरील कठोर कारवाई च पाणी गळतीचे प्रमाण रोखू शकते.

सर्वोत्कृष्ट आयडिया

सर्व पहा