प्लास्टिक पिशवी विरोधी मोहीम - महिलांना व युवतींना मोफत कागदी आणि कापडी पिशवीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन

वॅगन्स स्किल फौंडेशन तर्फे प्लास्टिक पिशवी विरोधी मोहीम सुरु करण्यात अली आहे. आतापर्यंत वॅगन्स स्किल फौंडेशन तर्फे १२५+ महिलांना व युवतींना मोफत कागदी आणि कापडी पिशवीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले गेले आहे. अजून कमीत कमी ५००००+ महिलांना व युवतींना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्याचे लक्ष योजिले आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेने काही आर्थिक मदत केली तर प्लास्टिक पिशवी विरोधी मोहीम अजून चांगल्या पद्धतीने आणि यशस्वी रित्या पूर्ण केली जाऊ शकते. सध्या पुणे शहरामध्ये स्वच्छता आणि साफसफाई चांगल्या पद्धतीने केली जाते. पण प्लॅस्टीक हाच घटक कचऱ्यामधून जास्तीत जास्त आढळला जातो. प्लॅस्टीकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात मोठया प्रमाणात होऊ लागला आहे. आणि आता तर प्लॅस्टीक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण ह्या प्लॅस्टिकचे जसे उपयोग आहेत त्यापेक्षा शतपटीने त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम आज सायन्सच्या आणि सर्वसामान्यांच्या लक्षात आले आहेत. आजघडीस प्लॅस्टीकचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि वारंवार होतो आहे की त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे, आणि याचे अतोनात गंभीर परिणाम प्राणी आणि मनुष्याच्या आऱोग्यावर दिसून आले आहेत. ह्या सर्व गँभीर बाबी लक्षात घेता वॅगन्स स्किल फौंडेशन तर्फे प्लास्टिक पिशवी विरोधी मोहीम सुरु करण्यात अली आहे. सकाळ न्यूज पेपर लाही मनपूर्वक आभार या प्लास्टिक पिशवी विरोधी मोहिमेची माहिती पेपर च्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल. आम्ही केलेले कार्यक्रमाचे काही छायाचित्र आणि माहिती तुम्हाला पाठवत आहोत त्याची नोंद घ्यावी हि विनंती धन्यवाद. वॅगन्स स्किल फौंडेशन, पुणे. राजकुमार दळवी ९९६०५९६१४३
Comments
No comments yet.
पहिल्यांदा तुम्ही

सर्वोत्कृष्ट आयडिया

सर्व पहा