
पुणे महानगरपालिका
वेबसाइटला भेट द्यापुर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळख असणाऱ्या पुणे शहराला गौरवशाली इतिहास लाभला असून शहराचे वर्तमान अभिनव तर भवितव्य आश्वासक आहे. पुणे महानगरपालिका १९५० सालापासून पुणे शहरात प्रशासकीय व्यवस्थापन करीत आहे व नागरिकांची सेवा करीत आहे.
पुणे महानगरपालिकेने आता ई-गव्हर्नन्सच्या अंमलबजावणीसाठी उपक्रम राबविला आहे. सरकारी संसाधनांमध्ये माहिती तंत्रज्ञान स्रोतांच्या प्रभावी वापरावर ई-गव्हर्नन्सचे यश अवलंबून आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

पुणे स्मार्ट सिटी
वेबसाइटला भेट द्यापुणे शहराचा समृद्ध व नैसर्गिक वारसा, मुबलक कुशल मनुष्यबळ आणि व्यवसायासाठी पोषक वातावरण या बलस्थानांचा योग्य वापर झाल्यास पुणे शहर भारतातील सर्वात चांगले वास्तव्याचे ठिकाण ठरु शकते. यासाठी शहरातील सामुहिक घटकांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा शाश्वत विकास तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ, हिरवा आणि राहण्याजोगा बनविण्याची गरज आहे.
पुणे स्मार्ट सिटी मिशनचा मुख्य उद्देश नागरिकांच्या खऱ्याखुऱ्या गरजा तसेच त्यांचा कल जाणून घेणे हा आहे. याशिवाय, 'मोअर विथ लेस' तत्वांवर आधारित उपाययोजना, स्वतःच्या स्रोतांपासून निधी उभारणारी शहरे, माहिती-संवाद व तंत्रज्ञानाधारित उपाययोजना व व्यवहार्यता, परिणामांवर लक्ष केंद्रीत करणे हादेखील आहे.

पुणे डेटास्टोर
वेबसाइटला भेट द्यापुणे डेटास्टोअर हे नागरिकांना शहरासंदर्भातील सर्व माहिती मोफत उपलब्ध करुन देणारे पोर्टल आहे. सर्वसाधारण नागरिक असोत वा व्यावसायिक वा विद्यार्थी, सर्वांना शहरविषयक माहिती तसेच शहरातील समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी आवश्यक ती माहिती या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
प्रत्येक प्रगतीशील समाजामध्ये सर्वसमावेशक कारभाराचे महत्त्व पुणे महानगरपालिकेने लक्षात घेऊन शहरासंदर्भातील सर्व माहिती नागरिकांसाठी खुली करुन दिली आहे. शहरातील सर्व नागरिकांना ही माहिती कोणत्याही कामासाठी मोफत उपलब्ध होणार आहे.

थेट लाभ हस्तांतरण
वेबसाइटला भेट द्यापुणे महानगरपालिकेने अपेक्षित लाभार्थींपर्यंत लाभ, अनुदान आणि सेवांचे वितरण करण्यासाठी पुणे मनपा थेट लाभ हस्तांतरण आणि सेवा पोर्टल विकसित केले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांशी निगडीत योजना डीबीटी सेवा पोर्टलवर उपलब्ध असून या योजनांच्या लाभार्थींना लाभ, अनुदान किंवा सेवांचे वितरण आधार पेमेंट ब्रिजद्वारे केले जाईल.

पुणे महानगरपालिका ब्लॉग
वेबसाइटला भेट द्यापुणे महानगरपालिकेच्या विविध योजना, उपक्रम याबाबत पुणेकरांना अपडेटस् देण्यासाठी CarePMC हा पुणे महानगरपलिकेचा ब्लॉग उत्तम व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. या ब्लॉगद्वारे योजनांच्या माहितशिवाय विविध उपक्रमांमध्ये किंवा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीची सविस्तर प्रक्रिया साध्या-सोप्या शब्दात उपलब्ध करून दिली जाते.